top of page
Our Team
shivaji.png
Shri Shivaji Khade
wagh1.jpeg
Shri Narayan Wagh
Director's Message

ध्येय नसलेलं आयुष्य व्यर्थ असत, असं थोरामोठयांकडून मी लहानपणापासूनच ऐकत आलो आहे.जीवनात ध्येय नसेल तर जगावं कशासाठी हा प्रश्न वारंवार मनाला सतावत असतो,म्हणूनच मी ही एक ध्येय ठेवलं,कदाचित माझं ध्येय खूप मोठं नसेलही पण त्या ध्येयप्राप्तीनंतर मला एक अमूल्य गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे “समाधान”. आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटवू शकणार असू आणि इतरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम असू तर यापेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट नाही ज्यातून तुम्हाला समाधान मिळू शकते. गेल्या १४ वर्षांपासून मी देखील इतरांचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहे. आपलं हक्काचं घर हे जणू औरंगाबाद सारख्या शहरात मध्यमवर्गीयांसाठी दिवास्वप्नच. संपूर्ण आयुष्य सामान्य माणूस इतरांची स्वप्न साकार करण्यात घालवतो पण स्वतःच्या #हक्काच्या_घराचं स्वप्न …?ते केवळ स्वप्नच राहत. वाढती महागाई,रिअलइस्टेट उद्योगावरील अवकळा या साऱ्या मायाजालात त्याच स्वप्नही लुप्त होतं.म्हणूनच मी निर्धार केलाय सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा.राजकारण्यांप्रमाणे केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणं माझ्या स्वभावात नाही. म्हणून खूप वेगळं किंवा कधीही न पाहिलेलं, अकल्पित असं घर तुम्हाला मिळेल अशी आश्वासनं मी तुम्हाला कदापि देणार नाही. पण एक वचन तुम्हाला नक्कीच देईल “तुमच्या हक्काचं घर मी असं बनवेल ज्यात माझा परिवारही आनंदाने आणि सुरक्षितपणे राहू शकेल. माझं घर,आपलं घर हेच डोळ्यासमोर ठेऊन उत्तमात उत्तम सर्वार्थाने परिपूर्ण देण्याचा मी यथोचित प्रयत्न करेल” वरद वात्सल्य प्रकल्पाच्या निमित्ताने तुम्हा सर्वाना शुभेच्छा तुमच्या सर्वांची साथ अशीच कायम ठेवा. सर्वांचे मनपूर्वक आभार ... !

bottom of page