सस्नेह नमस्कार,
घर म्हणजे केवळ चार भिंती आणि सिमेंटचा सांगाडा नव्हे, तर ते एका सर्वसामान्य कुटुंबाचे आयुष्यभराचे कष्टाचे स्वप्न असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबाला हक्काचं, सुरक्षित, प्रसन्न आणि उत्तम दर्जाचं घर मिळावं. याच पवित्र भावनेतून गृह वात्सल्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एल एल पी ची स्थापना झाली.
गेल्या १४ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात काम करताना आम्ही एकच तत्व प्रमाण मानले आहे — "मी स्वतः माझ्या कुटुंबासह ज्या घरात आनंदाने राहू शकत नाही, असे घर मी माझ्या ग्राहकाला कधीही देणार नाही."
आमचा वरद वात्सल्य (Varad Vattsalya) प्रकल्प बीड बायपास रोड, गांधेली फाटा येथे आणि श्री वात्सल्य (Shri Vattsalya) १४८ एन.ए. रहिवासी प्लॉटस् वंजारवाडी येथे आकार घेत आहेत. १००% कायदेशीर मंजुरी (MahaRERA Reg. No. P51500013580, CIDCO NA-44, टाऊन प्लॅनिंग व स्वतंत्र ७/१२), उच्च दर्जाचे साहित्य, आधुनिक लिफ्ट, आणि निसर्गरम्य शांत वातावरण ही आमची वैशिष्ट्ये आहेत.
आपल्या हक्काच्या घराच्या किंवा गुंतवणुकीच्या स्वप्नपूर्तीसाठी गृह वात्सल्य परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत आहे!